वाढत्या कोरोना संकटामुळे महापालिकेत मानधनावर 50 वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने महापालिकेतर्फे कोविड केअर सेंटर चालू केले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या डॉक्टरांची संख्या कमी पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने मुलखातीद्वारे 50 वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधनावर भरती केली आहे. दोन महिन्यांसाठी त्यांना घेण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास आणखी 25 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. दिवसाला साडेतीन हजारांपर्यंत नवीन रुग्ण आढळत आहेत. महापालिका रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महापालिकेकडून कोविड केअर सेंटर, जम्बो रुग्णालय सुरू केले आहे. महापालिकेचे उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे महापालिकेने मुलखातीद्वारे 50 वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधनावर भरती केली आहे.
वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.- शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ य इंडीयन मेडिसीन यांचेकडील नोंदणी बंधनकारक. इंटर्नशीप झाल्यानंतर 1 वर्षे कामाचा अनुभव असलेल्या डॉक्टरांची भरती केली आहे.
वैद्यकीय अधिकारी बी.ए.एम.एस.- शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस. पदवी उत्तीर्ण, सबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र बंधनकारक. संबधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोविड 19 आयुष नोंदणी असलेल्या डॉक्टरांना मानधनावर घेतले आहे.
वैद्यकीय अधिकारी कोविड 19 आयुष प्रमाणपत्रधारक - शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस./बी.यु.एम.एस.पदवी उत्तीर्ण, सबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र आणि संबधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोवीड 19 आयुष नोंदणी असलेल्या डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून घेतले आहे.